बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात सेरेना या तारांकित आणि लक्झरी हॉटेलच्या कार पार्कमध्ये स्फोट झाला. क्वेटा मधील हे सेरेना हॉटेल इराणी दूतावास आणि बलुचिस्तानच्या प्रांतीय विधानसभेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे सुरवातीला हा स्फोट इराणी दूतावासासमोर झाल्याची बातमी पसरली पण लगेचच बलुचिस्तानचे मंत्री डॉ. मीर जियाउल्लाह लांगोव यांनी ही घटना इफ्तार नंतर झाली असून कार सेरेना हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी होती, स्फोटात चार लोक ठार आणि ११ जखमी झाले असून ११ जखमींमध्ये एक पोलिस हवालदार असल्याची माहि
Read More
Written By, SHAMBHAVI PRAMOD THITE (Picture Cred
सिपेकने हाती घेतलेल्या प्रोजेक्ट पैकी एक तृतीयांश प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण झाला नाहीये. पैशांच्या अभावी अनेक कामं रेंगाळली आहेत. एकूण प्रोजेक्ट पैकी १९अब्ज डॉलर्सचे काम झाले असून दिरंगाईकरिता पाकिस्तानला जबाबदार धरण्यात येत आहे. पैशांच्या उधळपट्टीमुळे बांधकामे अपूर्ण राहिली आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार वृत्तपत्रानुसार २०१८ च्या उत्तरार्धात चीन आणि म्यानमारमधील व्यापार ६२ मिलियन डॉलरनी घसरला. म्यानमारमधील काही शेती उत्पादनांवर चीनने लादलेले निलंबन आणि म्यानमारच्या उत्तरेकडील शान राज्यातील म्युसे येथून केल्या जाणाऱ्या सीमेवरील व्यापारावरील घातलेली बंदी यासारख्या काही कडक निर्बंधामुळे या दोघांमधील व्यापार कमी झाला असल्याचा अंदाज या वृत्तपत्रांनी वर्तविला.
चीन पाकिस्तानात चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा ६२ बिलियन डॉलर्सचा मोठा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाअंतर्गत चीनच्या झीनजियांग पासून पाकिस्तानातील बलुचिस्तानला जोडणारे रेल्वेमार्ग, पाईपलाइन्स आणि महामार्ग यांचे मोठे जाळे चीन विकसित करीत आहे. सध्या पाकिस्तानात २०,००० पेक्षा जास्त चिनी नागरिक कायमस्वरूपी काम करीत आहेत तर दरवर्षी ७०,००० व्हिसा अल्पकालीन व्हिसा तत्वावर जारी केले जात आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी फुटीरतावाद्यांच्या कमांडरच्या हत्येनंतरही नैऋत्य पाकिस्तानातील फुटीरतावाद्यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पावर हल्ले चालू ठेवण्याची जणू काही शपथच घेतली आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितले की," आम्ही आमच्या मृत कमांडर अस्लम बलोच याच्या मार्गावरच मार्गक्रमण करीत राहणार आहोत. जोपर्यंत चीन बलोच लोकांचे शोषण थांबवित नाही तोपर्यंत आमची ही लढाई चालूच राहील."
जपानला चीनविषयी धोरण ठरवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कुशलतेने धोरणात्मक चर्चा करतानाच आपल्या हिताच्या नसलेल्या गोष्टींना तितक्याच धोरणात्मक पद्धतीने विरोध सुद्धा करावा लागणार आहे. अमेरिकेकडून असलेल्या सुरक्षेसंबंधातील अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीवर ठोस उपाय म्हणून जपानी लष्कराची कुवत वाढविण्यासाठी प्राईम मिनिस्टर शिंजो आंबे यांची बीजिंग सोबत उत्तम राजनैतिक आणि आर्थिक संबंध विकसित करण्याची योजना आहे. हेलिकॉप्टर्स वाहून नेणाऱ्या फ्लॅट-टॉप केलेल्या जहाजांचे रूपांतर जेट फायटर विमाने वाहून नेणाऱ्या जहा
लॅटिन अमेरिकेत चीनच्या वाढत्या अंमलाबद्दल यूएस सरकारकडून वारंवार टीका होत असताना आणि यूएस सरकारकडून इशारा मिळत असताना देखील चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या 'पनामा' भेटीचा अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे.
China, under the aegis of economic and infrastructure development projects have made strategic inroads into various countries around the globe. A sharp analytical observation is necessary as China makes inroads into a unruly neighbour, Pakistan.